धक्कादायक: प्रेयसीला मेसेज केला म्हणुन मित्राचीच केली हत्या , शीर वेगळे केले ....

 


हैदराबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे २२ वर्षीय तरुणाने आपल्या मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मित्राने आपल्या प्रेयसीला मेसेज पाठवून कॉल केल्यामुळे तरुणाने हत्या केली.

घटनेची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचा जबाब नोंदवून तपास सुरू केला असून, मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवला. 'नवीन आणि हरिहर कृष्णा या दोघांनी दिलसुखनगर कॉलेजमध्ये इंटरमिजिएटचे शिक्षण एकत्र पूर्ण केले होते. घटनेच्या केंद्रस्थानी असलेली मुलगी त्याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती,अशी माहिती पोलिसांनी दिली. नवीन आणि हरिहर कृष्णा हे दोघेही तरुणीच्या प्रेमात पडले होते. अगोदर नवीन त्या मुलीचे प्रमेसंबंध होते, पण काही दिवसांनी दोघेही वेगळे झाले आणि नंतर त्याचा हरिहर कृष्णा याच्यासोबत या मुलीचे प्रेमसंबंध सुरू झाले.

ब्रेकअप होऊनही, नवीन सतत तरुणीच्या संपर्कात होता आणि तिला मेसेज पाठवत होता आणि कॉल करत होता, त्यामुळे कृष्णा नाराज झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तीन महिन्यांहून अधिक काळ संधीची वाट पाहत होता. पोलिसांनी सांगितले की, 17 फेब्रुवारी रोजी दारूच्या नशेत दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि कृष्णाने नवीनचा गळा दाबून खून केला. आरोपीची हत्या केल्यानंतर त्याने त्याचे शीर वेगळे केले. हत्या केल्यानंतर आरोपीने नवीनचे फोटो काढून प्रेयसीला व्हॉट्सअॅपवर पाठवले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments