बस स्थानकावर रोड रोमिओचे विकृत कृत्य , लोकांनी धु धू धुतले

 


भंडारा : राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रेमप्रकरणातून हत्या आणि आत्महत्त्येच्याही घटना घडत आहेत. यातच आता भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा प्रकार समोर आल्यानंतर छेड काढणाऱ्या तरुणाची संतप्त जमवाकडून धुलाई करण्यात आली.

  काय आहे संपूर्ण प्रकरण - राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण आहे. भंडाऱ्यातही एक धक्कादायक घटना घडली. अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा प्रकार समोर आल्यानंतर छेड काढणाऱ्या तरुणाची संतप्त जमवाकडून धुलाई करण्यात आली.

मोहाडीतील बसस्थानक परिसरातील ही घटना आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला संतप्त जमवाकडून चांगलाच चोप मिळाला. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडीतील बसस्थानक परिसरात ही घटना घडली.

या संबंधित व्हीडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. संबधित पीडित तरुणी ही मोहाडी बस स्थानक परिसरात लघुशंकेसाठी गेली होती. यावेळी आरोपीने तिची छेड काढली आहे. दरम्यान, मुलीने आरडाओरड केली असता हा प्रकार लक्षात आल्यावर जमलेल्या गर्दीने आरोपी तरुणाला चांगलाच चोप दिला आहे. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


Post a Comment

0 Comments