सेल्स मॅनेजरने घातला 18 लाखांचा गंडा

 


नाशिक : औरंगाबाद रोडवरील एका फर्टिलायझर कंपनीच्या सेल्स मॅनेजरने कंपनीला तब्बल १८ लाखांना गंडा घातला.

विजय काशिनाथ भरणे (३५, रा. फाटा गोतोंडी, ता. इंदापूर, जि.

पुणे), असे त्याचे नाव आहे. हर्षल संजय गावंडे (रा. ओम गुरुदेव अपार्टमेंट, औरंगाबाद रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची रिचगबेल फर्टिलायझर कंपनी आहे.

या कंपनीच्या माध्यमातून ऑरगॅनिक खत उत्पादन व शेती उत्पादने घेतली जातात. या कंपनीच्या माध्यमातून राज्यभर ग्राहक, डिलर्स, वितरक आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये गावंडे यांनी संशयित विजय भरणे याची कंपनीच्या सेल्स मॅनेजर म्हणून नेमणूक केली होती. 

कंपनीच्या माध्यमातून संशयित भरणे याने इंदापूर, बारामती व इतर ठिकाणी कंपनीच्या सर्व डिलर्सला माल पोचवून मालाचे पैसे कंपनीला पोचविले. सुरवातीचे सहा महिने चोख कामकाज करीत संशयिताने विश्वास संपादन केला.

त्यानंतर संशयिताने गावंडे यांच्याकडून दुकानात माल ठेवण्यासाठी ८ लाख ४८ हार १५० रुपयांचा माल घेतला. डीलर्स, वितरकांना दिलेला ९ लाख ६४ हजार ६४५ रुपयांच्या मालाचे पैसे त्यांच्याकडून घेतले. परंतु ते कंपनीला न दिले नाहीत.

असे एकूण १८ लाख १२ हजार ७९५ रुपयांची कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी भरणे याच्याविरुद्ध आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक सुभाष जाधव तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments