मळ्यातून दोन गायींची चोरी ....

 


आर्टिलरी सेंटर रोडवरील खोले मळ्यातील गवळीवाडा येथे दूध व्यावसायिकाने घरासमोर मोकळ्या जागेत बांधलेल्या 40 हजार रुपयांच्या दोन गायी चोरट्यांनी चोरून नेल्या.

गवळीवाडा येथे राहणारे विजय निस्ताने यांचा दूध व्यवसाय असून, त्यांच्याकडे 10 म्हशी, 2 गीर गायी, 2 जर्सी गायी अशी एकूण 17 जनावरे आहेत.

गेल्या सोमवारी सायंकाळी निस्ताने यांनी गायी-म्हशींचे दूध काढल्यानंतर सर्व जनावरे नेहमीप्रमाणे घरासमोरील मोकळ्या जागेत बांधलेली होती. निस्ताने मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना काळ्या-पांढऱ्या रंगाची जर्सी गाय व तपकिरी रंगाची गीर गाय चोरीला गेल्याचे लक्षात आले. निस्ताने यांनी नाशिकरोड परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्या कुठेही आढळल्या नाहीत. उपनगर पोलिस ठाण्यात 40 हजार रुपये किमतीच्या दोन गायी चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

0 Comments