जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत सुभाष लुंड पत्नी राणीबाई लुंड यांच्यासह वास्तव्याला होते. याच परिसरात ते केकचे दुकान चालवून उदरनिर्वाह करत होते.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून त्याच्यावर कर्ज झाल्यामुळे त्यांचे दुकान बंद होते. त्यामुळे काही दिवसांपासून ते तणावात होते. शनिवारी रात्री जेवण करून झोपले, ते उठलेच नाही
पत्नी राणीबाई ह्या सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांना पती सुभाष लुंड हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. हे बघून तिने हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सातपुते यांनी मयत घोषित केले. सुभाष लुंड यांच्या आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
0 Comments