वडगाव मावळ: ट्रकने चिरडल्याने चिमुरड्याचा जागीच मृत्यू

 


वडगाव मावळ : मुंबई-पुणे महामार्गावर वडगाव-तळेगाव फाटा येथे ट्रकने दुचाकीला चिरडल्याने चार वर्षाच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला असून वडील जखमी झाले आहेत. कार्तिक ज्ञानेश्वर सुतार (वय 4 वर्षे, रा.

कान्हे फाटा, मूळ गाव -गारवडी, ता. खटाव, जि. सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे, तर ज्ञानेश्वर चिंतामण सुतार (वय 28) हे या अपघातात जखमी झाले आहेत.

पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सुतार हे त्यांचा मुलगा कार्तिक याच्यासह त्यांच्या दुचाकी (क्र.एम एच 12 इ.आर. 9852) वरून कान्हेफाटा येथून सोमाटणे बाजूला निघाले असता, वडगाव – तळेगाव फाटा येथे त्यांच्या दुचाकीला ट्रक (क्र.एम एच 13 डी क्यू 2933) ने जोरात चिरडले.

या अपघातात कार्तिक ट्रकच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाखाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाला, तर ज्ञानेश्वर सुतार यांच्या खांद्याला गंभीर जखम झाली. दरम्यान, घटना स्थळावरून ट्रकचालक फरार झाल असून, या अपघातात चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अपघातामुळे सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.


Post a Comment

0 Comments