रेल्वे स्टेशन बाहेर महिलेशी रिक्षा चालकाचे गैरवर्तन

 याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रिक्षा चालक (एम एच 14 जे.पी.7127) याच्या विरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांची बहिण व बहिणीची मुलगी यांच्यासोबत सिंहगड एक्सप्रेसमधून बुधवारी रात्री पिंपरी रेल्वे स्थानकावर उतरल्या, यावेळी त्या रिक्षा स्टँडजवळ आल्या असता एका रिक्षाचा त्यांच्या पर्सला धक्का लागला, यावेळी फिर्यादी यांनी रिक्षा चालकाला नीट रिक्ष चालवता येत नाही का असा जाब विचराला, मात्र तो रिक्षा न थांबता तेथून निघून गेला. यावेळी आरोपीची रिक्षा स्टँड  वर उभी होती. यावेळी आरोपीच रिक्षातून उतरून जा..जा तुझी काय औकात आहे म्हणून फिर्यादीच्या अंगावर धावून आला. तसेच त्याने फिर्यादाचा सर्वांसमोर हात पकडून त्यांना ढकलून दिले व हातात दगड घेऊन अंगावर धावून आला. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments