चौपाटीवर पाण्यात उडी घेऊन महिलेची आत्महत्या

 


जालना ; जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये जालना जिल्ह्यातील मोती तलावाच्या चौपाटीवरून पाण्यात उडी घेत एका 45 वर्षीय महिला शिक्षिकेने आत्महत्या केली आहे.

घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. जयश्री गणेश पोलास असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षिकेचे नाव असून त्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती गणेश पोलास हे नायब तहसीलदार आहेत. 

काल शनिवार असल्याने दुपारी मोतीबाग परिसरातील चौपाटीवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्या ठिकाणी तलावाच्या भिंतींवर बरेच नागरिक बसलेले होते. यादरम्यान जयश्री पोलास यादेखील चौपाटीवर पोहोचल्या. यानंतर त्यांनी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यानंतर हि घटना उघडकीस आली. 

जयश्री पोलास यांनी तलावात उडी घेतल्यानंतर लोकांनी चंदनझिरा पोलिसांना याची माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर जयश्री यांचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून तो उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.
जयश्री पोलास या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका तर त्यांचे पती गणेश पोलास हे महसूल खात्यात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.
जयश्री यांनी अचानक एवढे मोठे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. चंदनझिरा पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments