अल्पवयीन मुलाला रात्री फोन करून बोलावले अन्.... पुढे जे घडलं ते भयंकरच

 


एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच असताना जळगावात एक धक्कादायक घटना प्रकार समोर आला आहे.

येथे एका १६ वर्षीय विद्यार्थ्यावर एका २८ वर्षीय तरुणाने अनैसर्गिक अत्याचार केला. बारा जानेवारी रोजीची ही घटना असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात राहणार्‍या 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. घटना समोर येताच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील एका गावात पीडित 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा हा वास्तव्याला आहे. त्याला एका मोबाईल क्रमांकावरून गुड्डू नावाच्या अंदाजे 28 वर्षीय तरुणाचा 12 जानेवारी रोजी रात्री 11:30 वाजता फोन आला. आरोपीने या मुलाला जळगाव शहरात बोलवून घेतले.

पीडित मुलगा जळगावमध्ये आला असता आरोपीने त्याला जळगाव शहरातील एका भागात नेऊन त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलं. या घटनेनं या मुलाला चांगलाच धक्का बसला. या मुलाने आपल्यासोबत घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुड्डू नावाच्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.


Post a Comment

0 Comments