दारुसाठी पैसे न दिल्याने गुंडाकडून तरूणाच्या खुनाचा प्रयत्न

 


दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाच्या तोंडावर दगडाने ठेचून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न  केल्याचा प्रकार समोर आला आ  हे.

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी  कामगारनगर, येरवडा सचिन रिको लुंकड (वय २०) आणि नंदकुमार संजय पासंगे (वय २०, दोघे रा. कामगारनगर, येरवडा) यांना अटक केली आहे. सचिन किसन गायकवाड असे जखमी झालेल्याचे नाव आहे. 

याप्रकरणी नितीन किसन गायकवाड (वय ३३, रा. कामगारनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३५/२३) दिली आहे. ही घटना येरवड्यातील कामगारनगर चौकात गुरुवारी दुपारी अडीच वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन लुंकड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध घरफोडी व हत्यार बाळगणे असे दोन गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. फिर्यादी यांचा भाऊ सचिन हा लघुशंका करण्यासाठी घराबाहेर गेला असताना त्यांच्या वस्तीतील गुंड सचिन लुंकड व पासंगे यांनी त्यास दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांनी शिवीगाळ करुन त्याच्या तोंडावर दगडाने ठेचून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले.

फिर्यादी हे भावाला सोडविण्यासाठी गेले असताना लुंकड याने तलवार बाहेर काढून मध्ये आला तर खल्लास करुन टाकेल, अशी धमकी दिली.
इतरांच्या दिशेने तलवार फिरवून दहशत निर्माण केली.
पोलिसांनी दोघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक कवितके तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments