वृध्देच्या गळ्यातून दिवसा सोन्याची चेन लांबविली

 


शहरातील आकाशवाणी चौकातून दिवसा ६० वर्षीय २६ ग्रॅमची सोन्याची चेन चोरट्याने चोरून नेली.

आशाबाई रवींद्र पाटील (वय ६०, रा. कुंभारखेडा, ता. जि.जळगाव) बुधवारी (ता. १८) दुपारी तीनला कामासाठी आकाशवाणी चौकात आल्या होत्या. 

त्याचदरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची २६ ग्रॅमची चेन हात चालाखीने चोरून नेली. हा प्रकार वृद्ध महिलेच्या लक्षात येताच त्यांनी चेनचा शोध घेतला.

मात्र, ती सापडली नाही. शेवटी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलिस वंदना राठोड तपास करीत आहे.

Post a Comment

0 Comments