अडीच लाखांचे हशिश तेल विदेशिकडून जप्त

 


 अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पोलिस पथकाने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हरमल-पेडणे येथे फ्रेंच नागरिक युनिस धामाने (४५) याला अटक केली व त्याच्याकडून 240 ग्रॅम हशिश तेल जप्त केले.

ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 2 लाख 40 रुपये आहे. त्याला न्यायालयात उभे केले असता त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पोलिसांनी केलेली या वर्षातील चौथे प्रकरण आहे. गुरुवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास विदेशी नागरिक ग्राहकाची वाट पाहत उभा होता. त्यामुळे त्याचा पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ड्रग्ज सापडले. तो समुद्रकिनारी गिटार वाजवून लोकांचे मनोरंजन करत असल्याचे त्याने जबानीत सांगितले.

Post a Comment

0 Comments