ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

 राज्य विधिमंडळ अधिवेशनांचे वार्तांकनाने विजय भोसले यांच्या पत्रकारीतेची कारकीर्द ओळखली जात होती. त्याचबरोबर त्यांनी पिंपरी महापालिकेचेही वार्तांकन केले. ते दैनिक केसरीच्या पिंपरी कार्यालयाचे प्रमुख होते.पत्रकारितेतील अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहीले जायचे. भोसले यांनी एकदा महापालिकेची निवडणूकही लढविली होती.

दोन दिवसांपूर्वी भोसरीतील एका खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी ते आले होते. उद्घाटनानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथून वायसीएमएच मध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान आज सकाळी भोसले यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्का  बसला आहे.

विजय भोसले यांच्या पार्थिवावर आज (सोमवार) सायंकाळी सहा वाजता नेहरूनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Post a Comment

0 Comments