वाहन ठेवण्यावरून वाद , युवकाचा खून

 


घरसमोर मॅक्सी वाहन ठेवण्याच्या कारणाहून दोन गटात झालेल्या वादातून झालेल्या हाणामारीत १८ वर्षीय युवकाचा खून झाला. याप्रकरणी तिघे जखमी असून त्यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.

घटना यशोधरानगरात गुरुवारी (ता.१९) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास घडली.

योगेश धामने (वय १८ रा. इंदिरा गांधीनगर) असे मृतक युवकाचे नाव असून तो पेंटिंगचे काम करतो. रामभाऊ शाहू (रा. विनोबा भावेनगर) असे जखमीचे नाव आहे. मोनू बन्सीलाल रायतदार (वय २२), सुदामा बन्सीलाल रायतदार वय (वय २४) आणि नंदलाल रायतदार (सर्व रा. विनोबा भावेनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रामभाऊ शाहू आणि योगेश धामने यांच्या मोनू रायतदार, सुदामा आणि त्यांचा काका नंदनलाल रायतदार यांच्यात घरासमोर मॅक्सी वाहन ठेवण्यावरून वाद झाला होता. झालेल्या भांडणात त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. दरम्यान गुरुवारी रात्री जेवण झाल्यावर योगेश रामभाऊ शाहू यांच्या घरी आला.

ते दोघेही बाहेर उभे असताना, मोनू आणि योगेशमध्ये पुन्हा वाद झाला. त्यातून रामभाऊ यांनी मोनूला मारहाण सुरु केली. त्यामुळे घरातून नंदलाल आणि सुदामा आल्याने त्यांनी चाकू, दंडा आणि लोखंडी रॉडने योगेशला मागण्यास सुरुवात केली.

यात योगेशचा जागीच मृत्यू झाला. रामभाऊ शाहू आणि मोनू गंभीर जखमी झाल्याने त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले. विशेष म्हणजे रामभाऊ शाहू याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला.


Post a Comment

0 Comments