दोन मुलींनंतर पुन्हा ' जुळ्या , मुली झाल्या अन् शेतकरी बापानं संपवलं जीवन

 


मध्य प्रदेशातील बालाघाट येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीला दोन जुळ्या मुली झाल्याने त्याने आत्महत्या केली.

खरं तर मृत बापाने वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी मारून जीवन संपवले. लक्षणीय बाब म्हणजे त्याला आधी दोन मुली असल्याने तो तणावाखाली होता. त्याच्या पत्नीची ही तिसरी प्रसूती होती आणि यावेळी मुलगा होण्याची त्याला अपेक्षा होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागे कौटुंबिक वादाचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

माहितीनुसार, आत्महत्येची ही घटना 18 जानेवारी रोजी घडली आहे. एक व्यक्ती सतत मोबाईलवर बोलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मोबाईलवर बोलत असताना त्याने वैनगंगा नदीत उडी घेतली. अनेकांनी त्याला नदीत उडी मारताना पाहिले. हा प्रकार पाहताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. याठिकाणी पोलीस आणि होमगार्ड नदीत तरुणांचा शोध घेत होते. रात्रीही होमगार्डने अनेक तास शोधमोहीम राबवली. मात्र, तरुणाचा मृतदेह सापडला नाही.


Post a Comment

0 Comments