कर्ज देण्याच्या आमिषाने तरुणाची तब्बल 7लाख 60हजारांचा फसवणुक

 


व्यक्तिक कर्जाचे आमीष देत मंगरुळ (ता. अमळनेर) येथील तरुणाची तब्बल ७ लाख ६० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली 

मिलिंद प्रकाश पाटील (वय २३, ह.मु.

हिंजेवाडी, पुणे) याला बुधवारी (ता. १८ ) एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यात पर्सनल लोन व क्रेडिट कार्ड लोन देत असल्याचे बतावणी करण्यात आली. 

मिलिंद पाटिल याचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून मोबाईलवर आलेला ओटीपी नंबरच्या आधारे तरुणाच्या नावाने आलेले लोनची रक्कम आणि त्याच्या खात्यातील रक्कम, अशी एकूण ७ लाख ६० हजार रुपयांच्या रकमेला परस्पर ऑनलाईन परस्पर खात्यातून लंपास करून फसवणूक केली.

खात्यातून रक्कम लंपास झाल्याची माहिती कळाल्यावर शुक्रवारी (ता. २०) दुपारी सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी नंबरधारकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments