ट्रेलर व कारच्या धडकेत कार चालकाचा मृत्यु

 अपघातात इरटिगा कारचा (एमएच 01 बीयू 7111) चालक गजराज फत्ते सिंग (वय 41 रा. अंधेरी, मुंबई) याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी ट्रेलर चालक (एमएच 46 बी.एम 6591) याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण-तळेगाव दाभाडे रोडवर ट्रेलर चालकाने भरधाव वेगात राँग साईडने जात असताना समोरून येणाऱ्या इर्टिगा कारला जोरदार धडक दिली. यामध्ये गजराज गंभीर जखमी झाले व त्यांच्या कारचे पाच लाखांचे नुकसान झाले, यावेळी ट्रेलर चालकाने तेथे थांबून जखमीला मदत न करता पळ काढला. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments