खडकवासला येथे दोन गटांत हाणामारी

 


पूर्व वैमनस्यातून खडकवासला येथील दोन गटांमध्ये हाणामारीची घटना घडली असून कोयत्याचे घाव बसल्याने तिघेजण जखमी झाले आहेत. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून दोघांना पोलीसांनी अटक केली आहे, तर तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शनिवारू (दि. 17) रात्री आठच्या सुमारास सागर भरत मते (वय 28), मयुर अरविंद चव्हाण (वय 23),

मोहन राठोड (वय 32), उमेश राठोड (वय 34), चेतन राठोड (वय 22, सर्व रा. खडकवासला) आणि इतर तीन अनोळखी आरोपींनी अस्लम सालार शेख (वय.24, रा. खडकवासला धरणामागे, लांडगे वस्ती) याला तुझा भाऊ मिनाजला नीट समजावून सांग असे म्हणत जबरदस्तीने दुचाकीवरून नेऊन मारहाण केली.

आरोपी अस्लम शेख याला मारहाण करून पुन्हा खडकवासला धरणाच्या कालव्याजवळ घेऊन आले. अस्लम शेखने मारहाण झाल्याचे भाऊ मिनाज शेख (वय 23) याला सांगताच तेथे असलेले अथर्व मदन मते (वय 19), कुणाल रामभाऊ सोनवणे (वय 18), आकाश राजेंद्र थिटे (वय 23), आनंद विश्‍वास तागुंदे (वय 22), मारुती बाबू चव्हाण (वय 20), एक अल्पवयीन (सर्व रा. खडकवासला) आणि इतर चार-पाच अनोळखी आरोपींनी साहिल अरविंद चव्हाण, चेतन राठोड व मयुर अरविंद चव्हाण यांच्यावर कोयत्याने वार केले.

घटनेची माहिती मिळताच हवेली उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक निरीक्षक नितीन नम, निरंजन रणवरे व इतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल क रण्यात आल्या असून मिनाज शेख व आकाश थिटे यांना हवेली पोलीसांनी अटक केली आहे.


Post a Comment

0 Comments