लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा क्षण असतो. लग्नात लोक एकमेकांची शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन देतात. मात्र, लग्नाच्या काही घटना अशा असतात ज्या सगळ्यांनाच थक्क करून सोडतात.
बिहारमधील असंच एक लग्न सध्या चांगलंच चर्चेत आहे. यात केवळ 48 तासात महिलेनं 2 लग्न केली. या घटनेत एका विवाहित महिलेने आधी आपल्या पतीला सोडून एका तरुणाशी लग्न केलं, जो तिचा भाचाच होता.
मुलीचे कुटुंबीयही या लग्नाचे साक्षीदार झाले. अनिता देवी या महिलेनं सेटलमेंट लेटरमध्ये लिहिलं की, तिला तिचा पती डब्लू शर्माला सोडून नवीन प्रियकर संतोष कुमारसोबत राहायचे आहे. तिने स्वतःहून वरील निर्णय घेतला आहे. ती तिचा पहिला पती डब्लू शर्मावर कोणताही दावा करणार नाही.
बिहारमधील खगडिया जिल्ह्यातून हे प्रकरण समोर आले आहे. चौथम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालपा गावात राहणारा संतोष कुमार हा तरुण महेशखुंट पोलीस ठाण्याच्या काझीचक येथील आपल्या मामाच्या घरी जात असे. संतोषचे मामा मजुरीचे काम करतात. दरम्यान, संतोषचे त्याच्या मामीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले, त्यानंतर दोघांना गावकऱ्यांनी पकडले.
0 Comments