यापैकी काही लोकांना हसवतात, तर काही व्हिडीओ लोकांना विचार करायला लावतात. सध्या अशाच एका व्हिडीओने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्यामध्ये एक तरुण रस्त्याने जाणाऱ्या मुलीला धमकावताना दिसत आहे. पण पुढच्याच क्षणी ती मुलगी त्याला असा धडा शिकवते की, त्याला त्याच्या आजीची आठवण येते.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर उभा असलेला एक तरुण कुणाला तरी धमकावत आहे. पुढच्याच क्षणी एक मुलगी पुढे येते, तो तरुण मुलीला कमकुवत समजून धमकावत होता, तीच त्याची मस्ती उतरवेल याची मुलाला जराही कल्पना नव्हती. तुम्ही पाहू शकता की, मुलगी हळू हळू त्या तरुणाच्या दिशेने जाते आणि नंतर त्याच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा देते. मग तिथे काय होते? हे पाहून नेटकरीही आश्चर्यचकीत झाले आहेत. मुलाला ठोसा मिळताच तिथेच जोरात असा कोसळतो की पुन्हा उठू शकलाच नाही.
0 Comments