ग्राहकांना उधारी देण्यावरुन दोन मेडिकल दुकानदाराला मारहान झाल्याची घटना कल्याण जवळील बापगावात घडली आहे. मारहाणीची सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
कल्याणमधील बापगावात एकाच ठिकाणी रॉयल मेडिकल आणि मेट्रो मेडिकल आहेत. यापैकी रॉयल मेडिकल चालक ग्राहकांना औषध खरेदीवर आकर्षक सूट देतात. तसेच येणाऱ्या ग्राहकांना उधारी देखील देतात.
याच कारणामुळे संतप्त झालेल्या मेट्रो मेडिकल दुकानदारांनी थेट रॉयल मेडिकल दुकानात घुसून लालाराम सिरवी याला मारहाण केली. या मारहाणीत सिरवी यांना दुखापत झाली.
मेट्रो मेडिकल दुकान मालक दरवेळी आमच्याकडे येऊन लायसन्स आहे का याची विचारपूस करत असतात. तसेच रविवारी 27 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास दुकानात घुसून आम्हाला मारहाण केली असल्याचे लालाराम सिरवी यांच्याकडून सांगण्यात आले. यासंबंधी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली असल्याचे सांगण्यात आले.
0 Comments