भररस्त्यात गुंडांची दादागिरी , प्राणघातक हल्ला

 


वसईमध्ये भररस्त्यात गुंडांच्या दादागिरीचा थरार पहायला मिळाला आहे. कारला अडवून तीन इसमांनी एकावर तलावरीने प्राणघातक हल्ला करत हवेत गोळीबार केला आहे.

घटनेचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तलवारीने सपासप वार करून जखमी इसमाला बोलेरो पिकअप कारमध्ये टाकून आरोपी फरार झाले आहेत. याबाबत वालीव पोलिसांनी घटनास्थळावरून एक तलवार, एक बोलेरो गाडी जप्त करून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भर रस्त्यात घडलेल्या या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

वसईच्या वालीव येथील नाईकपाडा येथे आज सायंकाळी सहा वाजता मनसे कार्यालयाच्या शेजारी ही घटना घडली. एम.एच.48 सी.बी. 0070 या बोलेरो गाडीतून डुक्कर घेवून वसईच्या दिशेने जात होती. तेवढ्यात समोरुन बोलेरो कंपनीच्या पिकअप गाडीने त्या बोलेरो गाडीला ठोकर मारत रस्त्यावरच अडवले 

पिकअप गाडीतून तिघे बाहेर आले. त्यापैकी एकाने तलवारीने हरजित सिंग उर्फ दादू याच्यावर वार केले. त्याचबरोबर बोलेरो गाडीतील इतर चार जण फरार झाले. घटनास्थळी इतर नागरिक वाचवण्यासाठी येवू नये म्हणून, दुसऱ्या आरोपीने जवळची पिस्तुल बाहेर काढली.

गाडीवर फायरिंगचे तसेच तलवारीच्या वारचे निशाण आहेत. आरीपींनी जखमी दादूला आपल्या गाडीत बसवून घेवून गेले आहेत. काही अंतरावर ती गाडी सोडून, दुसऱ्या गाडीने आरोपींनी जखमी दादूला नेले.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिजत सिंग उर्फ दादू आणि त्याच्या सहकाऱ्यांचा डुक्कर पाळणे आणि विक्री करण्याचा व्यवसाय आहे. आरोपी आणि जखमींमध्ये अंतर्गत वाद असल्याचं बोललं जात आहे. सध्या वालीव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. आरोपी आणि जखमी दादूचा पोलीस शोध घेत आहेत. जखमीच्या गाडीत तीन ते चार डुक्करही आढळून आले आहेत.

Post a Comment

0 Comments