दुसरं लग्न केल्यानं महिलेला खांब्याला बांधलं , मारलं , मग....

 


गुजरातमधील अमरेलीमध्ये एका महिलेसोबत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या पतीचा चार वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सुमारे वर्षभरापूर्वी पतीच्या निधनानंतर तिने दुसरे लग्न केले होते.

पीडित महिलेने दूसरं लग्न केल्यानं पीडितेच्या पहिल्या पतीच्या नातेवाइकांनी तिला मारहाण केली. तसेच महिलेला रस्त्यावर ओढले. त्यानंतर त्याला खांबाला बांधून बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर महिलेचे केसही कापल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


Post a Comment

0 Comments