प्रेमासाठी काय पण; 3 मुलांची आई पडली प्रेमात , प्रियकरासह पळून गेली , दुसरं लग्न केलं अन्....

 


प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से देखील नेहमीच ऐकायला मिळतात. झारखंडमध्ये अशीच हटके गोष्ट पाहायला मिळाली आहे. गढवा जिल्ह्यात तीन मुलांची आई प्रेमात पडून प्रियकरासह पळून गेल्याची घटना समोर आली आहे.

यानंतर तिने दुसरं लग्न देखील केले. महिलेच्या पतीने तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गढवा जिल्ह्यातील केतार पोलीस स्टेशन क्षेत्रातील बिजदीह गावातील रहिवासी कन्हैया साह याने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद केसरी यांच्याकडे तक्रार केली आहे. यामध्ये त्याने आपल्याला तीन मुलं असल्याचं म्हटलं आहे. घटस्फोट न देता पत्नीने 1.50 लाख रुपये रोख आणि दागिने घेऊन घरातून पळ काढला आहे. तिने दुसरे लग्नही केल्याचंही म्हटलं आहे.

पोलीस अधिकार्‍यांना दिलेल्या तक्रारीत कन्हैया साहने 13 वर्षांपूर्वी लग्न केलं आहे. यातून त्यांना तीन मुले आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्याच्या पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. नकार दिल्याने पत्नीने सासरच्यांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. हे प्रकरण अजूनही न्यायालयात सुरू होते.

21 डिसेंबर रोजी तीन मुलांना सोडून पत्नीने दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून जाऊन लग्न केले. आईने घर सोडल्यानंतर तिन्ही मुले सध्या वडिलांकडे आहेत. यासंदर्भात चाइल्डलाइनचे समन्वयक रोबोट कछाप यांनी सांगितले की, तरतुदीनुसार या मुलांना शक्य ती सर्व मदत केली जाईल.


Post a Comment

0 Comments