माढा : बिट स्तरावर क्रीडा स्पर्धेमध्ये उपळवटे जि.प.प्रा. शाळेचा दणदणीत विजयमाढा (संदीप घोरपडे):  माढा तालुक्यातील उपळवटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी बीट स्तरावरील कनेरगाव येथे पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये दणदणीत विजय मिळवत उपळवटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नाव उज्वल केले आहे.

कबड्डी मध्ये मोठ्या गटातील विद्यार्थी प्रथम क्रमांकावर तर लंगडी मध्ये लहान गटातील मुली प्रथम क्रमांक वर 100 मीटर व 200 मीटर धावण्यामध्ये मोठा गटातील मुली प्रथम आलेले आहेत, तर लहान गटातील मुली कबड्डी मध्ये द्वितीय क्रमांकांवर आल्या असल्याने उपळवटे गावातील नागरीकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचा मान सन्मान व सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात ठेवण्यात आला होता .

यावेळी उपस्थित

उपळवटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अजिनाथ शिंदे सर, प्रकाश भवर सर, ज्योतीराम तळेकर सर , हरिदास मुळीक सर,  

मंदाताई खोसेे मॅडम,  पांडुरंग माळी सर , इंन्नुस मुलाणी गुरुजी,  विद्यमान सरपंच राहुल घाडगे, माजी सरपंच बालाजी गरड पाटील,  शाळा व्यवस्थापन समिती सदस्या प्रियांका संदीप घोरपडे,  शिक्षण प्रेमी अशाभाऊ गरड पाटील , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास सपाटे , उपाध्यक्ष महेश देवडकर,  सर्व सदस्य गावकरी आदी मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments