40 लाख उसने घेतलेले ; भाडेकरूची हत्या करून मृतदेहाचे केले 3 तुकडे

 


उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे एका घरमालकाने भाडेकरूची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे धारदार शस्त्राने तीन तुकडे केले व ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ज्याची हत्या झाली त्याचे नाव अंकित खोकर असून तो उमेश शर्मा याच्या घरात भाडेकरू म्हणून राहात होता. लखनऊ येथे तो पीएच.डी. करत होता. अंकित हा बागपतचा मूळ रहिवासी आहे. त्याने नुकतीच आपली जमीन १ कोटी रुपयांना विकली होती. त्यातील सुमारे ४० लाख रुपये त्याने उमेशला उसने दिले होते. ही रक्कम परत करू न शकलेल्या उमेशने अंकितची ६ ऑक्टोबर रोजी हत्या केली.


Post a Comment

0 Comments