उपअधीक्षकांनी पकडला २ लाखांचा गुटखा

 


शहरातील मच्छिबाजार भागात भरदुपारी २ वाजेच्या सुमारास शकील अन्वर अब्दुल खाटीक (रा. मच्छिबाजार, धुळे) याला शिताफिने पकडण्यात आले.

त्याच्याकडून १ लाख ९२ हजार ३०० रुपयांचा गुटखा, पानमसाला असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्या विरोधात आझादनगर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु हाेते.

पोलीस उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार मच्छिबाजार परिसरात अवैधरित्या स्वत:जवळ गुटखा, पानमसाला बाळगून आहे. तो छुप्या पध्दतीने विक्री करतो. माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. तो पळून जात असताना त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून गुटखा, पानमसालाच्या पुड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे चर्चेला उधाण आले.


Post a Comment

0 Comments