भररस्त्यात त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि लागली ना गाड्यांची रांगच रांग

 


खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो असंच काहीसं म्हणायला पाहिजे. कारण सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल  होतो आहे तो पाहून नेटकरी हेच म्हणत आहेत.

तपतपत्या उन्हात भररस्त्यात त्याने तिला मिठीत घेतलं आणि जणू काही दुनियाच थांबली...असं म्हणतात प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपण काहीही करतो. शाळेतलं प्रेम  असो किंवा कॉलेजचं प्रेम  पहिलं प्रेम हे प्रत्येकाच्या लक्षात राहितं. कुठे ना कुठे त्या व्यक्तीची आठवण मनात कायम राहतं. कोणाला ते प्रेम मिळतं. तर कोणाचं प्रेम अधुरं राहत 

सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक तरुण तरुणभररस्त्यात एकमेकांना घट्ट मिठ्ठीत घेतलं आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक थांबली आहे. हे दृष्य पाहून वाहनातील चालक बाहेर आले त्यांना तिथून जाण्यास आरडाओरडी करु लागले. हे पाहून तिथे एक ट्रॉफिक पोलीस आला आणि त्याने लोकांना त्या प्रेमी युगुलापासून  दूर राहण्यास सांगितलं.

एवढा तमाशा सुरु असल्याचं पाहूनही या दोघांनी एकमेकांना सोडलं नाही. ते एकमेकांच्या मिठ्ठीत रमले होते. असं वाटतं होतं भूकंप झाला तरी आता ही मिठ्ठी सुटायची नाही. या व्हिडिओमधील विशेष गोष्ट म्हणजे वाहतूक कोंडी सोडविण्याचं काम हे ट्रॉफिक पोलिसांवर असतं. या दोघांमुळे वाहतूक कोंडी झालेली पाहून सुद्धा तो पोलीस त्या दोघांची बाजू घेत होता. 

घडलेला सगळा प्रकार इथे उपस्थित कोणी तरी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  इन्स्टाग्रामवर broken_boy_sk__143 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला. या व्हिडिओला तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये True love असं लिहिण्यात आलं आहे.

Post a Comment

0 Comments