अन्नातून 70 लोकांना विषबाधा

 


भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नामकरण सोहळ्यात अन्नातून झाली 70 लोकांना विषबाधा झाल्याचे खळबळ उडाली आहे.

विषबाधा झाल्याने हगवण आणि उलट्यांचा त्रास झाला आहे. विषबाधा झालेल्या लोकांवर मोहाडी, तुमसर, भंडारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. नामकरण सोहळ्यात अन्नातून 70 लोकांना विषबाधा झाल्याची घटना भंडारा जिल्हाच्या मोहाडी तालुक्यातील विहीरगाव येथे घडली आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी रात्रीला हगवण आणि उलट्यांच्या त्रास झाल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

विहिरगाव गाव येथील आकाश नारायण ढेंगे यांच्या मुलाचा 18 डिसेंबरला घरी नामकरण सोहळा होता. दरम्यान, याठिकाणी झालेल्या स्वरुचि भोजना दरम्यान अन्नातुन विषबाधा झाली. दुसऱ्या दिवशी रात्रीला हगवण आणि उलटयांचा त्रास झाल्याने अचानक रुग्णालयात पेशंट येऊ लागल्याने हा प्रकार उघडीस आला आहे. आता या रुग्णांवर मोहाडी, तुमसर आणि भंडारा रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Post a Comment

0 Comments