अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

 


सकाळी सायकलवरुन शाळेत जाणार्‍या अल्पवयीन मुलीस दुचाकी आडवी लावून, 'तू मला खूप आवडते. माझे तुझ्यावर प्रेम आहे,' असे म्हणत त्रास देणार्‍या तरूणाविरुद्ध विनयभंगासह अ‍ॅट्रोसिटी व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

(दि.22) डिसेंबर रोजी ही घटना घडली.

14 वर्षीय अल्पवयीन मुलगी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सायकलवरून शाळेत जात होती. मुलगी मागासवर्गीय समाजाची आहे, हे माहित असताना देखील आरोपी मुजमीन पठाण याने तिचा दुचाकीवरुन पाठलाग करून देवळाली प्रवरा शहरात डेपो चौक येथे तिच्या सायकलला दुचाकी आडवी लावून तिला थांबविले. वाईट हेतूने तिचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

या घटनेनंतर पीडित मुलीने राहुरी पोलिस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला. तिच्या फिर्यादीवरून आरोपी मुजमीन मुसा पठाण (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. 1325/2022 भादंवि कलम 354 (अ), 354 (ड), 341 सह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12 सह अनुसूचित जाती- जमाती प्रतिबंधक अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास श्रीरामपूर येथील उप विभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके करीत आहेत.


Post a Comment

0 Comments