सकाळी मुलीला जन्म दिला आणि संध्याकाळी बनली ८० लाखांची मालकीण

 


मुलीच्या जन्मामुळे एका महिलेचं नशीब पालटलं आहे. कारण, या महिलेने सकाळी मुलीला जन्म दिला आणि संध्याकाळी ती ८० लाखांची मालकीन बनली आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात ही मुलगी 'लकी चार्म' असल्याचं महिलेने म्हटलं आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील ब्रेंडा नावाच्या २८ वर्षीय महिलेने ९ नोव्हेंबरला सकाळी एका मुलीला जन्म दिला आणि त्याच दिवशी सायंकाळी तिला लॉटरी लागली.

या लॉटरीमध्ये तिला बक्षीस म्हणून तब्बल 80,000 पौंड म्हणजेच सुमारे 80 लाख रुपये मिळाले आहेत. त्यामुळे ही मुलगी जन्माला येतानाचं नशीब घेऊन आली असल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान, लॉटरीत जिंकलेल्या रक्कमेतून टॅक्स वगैरे कापून ब्रेंडाला जवळपास 53 लाख रुपये मिळाले. ते पैसे ३० नोव्हेंबर रोजी तिच्या खात्यात जमा करण्यात आलेत.


Post a Comment

0 Comments