मंचर -दीड महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या 28 वर्षीय तरुणाने पहाडदरा (ता. आंबेगाव) येथे झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुण शेखर शांताराम पवार (रा. वाफगाव, मांदळेवाडी, ता.
असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील शांताराम गेणू पवार यांनी पारगाव (ता. आंबेगाव) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेखर पवार याची तीन लग्न झाली होती. त्याच्या तीनही बायका सोडून गेल्या आहेत. पत्नी सोडून गेल्यापासून तो नैराश्यामध्ये होता. या अगोदरही त्याने तीन वेळा जीव देण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत 17 ऑक्टोबर 2022 रोजी खेड पोलीस ठाण्यात शेखर शांताराम पवार हा बेपत्ता झाले असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
दरम्यान दीड महिन्यानंतर मंगळवारी (दि. 29) पहाडदरा गावच्या हद्दीत जंगलात झाडाला गळफास घेतल्याचा सांगाडा सापडल्याचे पोलीस पाटील माऊली कराळे यांनी शांताराम पवार यांना कळवले. त्यांनी घटनास्थळी कागदपत्रे पाहूनआत्महत्या केलेला मुलगा शेखर पवार असल्याची खात्री केली आहे.
0 Comments