युट्यूबर मनोज डे याची कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपले वडील एकेकाळी सायकल रिपेअरिंगचं काम करायचे. त्यांची दिवसाची कमाई २५० रुपये इतकी होती.
मनोजचं प्राथमिक शिक्षण एका सरकारी शाळेत झालं आङे. आयटीआयचा कोर्स केल्यानंतर मनोज गुजरातच्या एका फॅक्ट्रीमध्ये कामाला लागला. पण काही दिवसातच नोकरी सोडून तो घरी परतला. त्यानं घरीच ट्यूशन घेणं सुरू केलं सोबतच जवळच्या एका सायबर कॅफेमध्ये तो काम करू लागला. सायबर कॅफेमध्ये काम करताना मनोजनं सहजच एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओच्या थमनेलवर लिहिलं होतं...यूट्यूबमधून पैसे कसे कमावयाचे? मनोजनं व्हिडिओ पाहिला आणि त्यानं यूट्यूबर बनायचं असं ठरवून टाकलं. सुरुवातीच्या काळात मनोजला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं.
0 Comments