कामावरून येऊन झोपला अचानक छातीवर विषारी नाग पडला

 


साप समोर दिसला किंवा त्याचं नावही ऐकलं तरी अनेकांना घाम फुटतो. कारण हा लहान जीव अगदी काही मिनिटांमध्येच एखाद्याचा जीव घेऊ शकतो.

मात्र, अनेकदा अचानक आपल्यासोबत अशा काही घटना घडतात, ज्या थरकाप उडवणाऱ्या असतात. अशीच एक घटना आता मावळातून समोर आली आहे. ज्यात विषारी नाग एका व्यक्तीच्या छातीवर पडला. वातावरणाचा फटका वन्यजीवांनाही बसू लागला आहे. दोन दिवसांपासून मावळात उकाडा जाणवू लागलाय. त्यामुळे सरपटणारे वन्यजीव सैरभैर होत असल्याचं आंबी एमआयडीसीतील कामगार वस्तीत दिसून आलं. याठिकाणी एक थरकाप उडवणारी घटना घडली.

कामावरून घरी आलेला कामगार नुकताच जमिनीवर आडवा पडला होता. इतक्यात त्याच्या छातीवर विषारी नाग पडला. या नागाला पाहताच कामगार घाबरून गेला. वेळ न घालवता त्याने लगेच त्याच्या हाताजवळ असलेला मोबाईल घेतला आणि त्यावरुन त्याने सहकाऱ्याला याबाबत माहिती दिली.


Post a Comment

0 Comments