ट्रॅक्टरला ट्रकची मागून धडक , शेतकरी ठार

 


सिन्नर-घोटी रस्त्यावर पांढुर्ली शिवारात ट्रक आणि ट्रॅक्टरच्या अपघातात तरुण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी दि.9 सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली 

पांढुर्ली शिवारात गणलक्ष्मी बियर शाॅपी समोर हा अपघात झाला असून उत्तम काशिनाथ तुपे (40, रा. बेलू, ता. सिन्नर) असे मयत तरुणाचे नाव आहे. अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सिन्नर बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारातील टमाटा मार्केट येथुन बेलू येथील तीन शेतकरी ट्रॅक्टरने (क्र.एमच.15.एचक्यू. 9986) टमाटे विक्री करुन घराकडे परतत होते. गणलक्ष्मी बियर शाॅपी जवळ कोबीने भरलेल्या ट्रकने (एमएच.15.सीके.5100) ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टर चाळीस फुट फरफटत गेला.

या अपघातात एक जण जागीच ठार झाला. जखमींना एस एम बी टी हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल केले आहे. चंद्रकांत वाजे व कैलास वाजे यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर सिन्नर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. तरुण शेतकऱ्यांच्या मृत्यूने पांढुर्ली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिन्नर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Post a Comment

0 Comments