बसल्या बसल्या पेपर वाचत होता... अन् अचानक असं काही झालं की ...

 


सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजक असतात, तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. अशाच व्हिडीओमधून काही गोष्टी शिकण्यास मिळतात.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय.

व्हिडिओमध्ये एक तरुण बेंचवर बसून वर्तमानपत्र वाचत बसला आहे. पण बसल्या बसल्या त्याला हृदयविकाराचा  झटका येतो. त्यानंतर तो खाली पडताना व्हिडीओमध्ये दिसतोय. यादरम्यान त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. योगायोगानं ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Post a Comment

0 Comments