चारित्र्याच्या संशयावरून विभक्त पत्नीचा गळा चिरला

 


शिवशंकर शौरप्पा मेनसे (वय 30) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत. आरोपी पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेम संबंध आहेत आणि त्याला दारूचे व्यसन असल्याने फिर्यादी मागील तीन वर्षापासून त्याच्यापासून विभक्त राहतात. दरम्यान 16 नोव्हेंबर रोजी आरोपीने फिर्यादीला जेवणाचा डबा घेऊनच सांगितले. त्यानंतर चंदन नगर परिसरातील भाजी मंडई परिसरात त्याने आपल्या ताब्यातील मिनी बसमध्ये फिर्यादीला बोलावले. त्यानंतर रोमान्स करण्याच्या पाहण्याने फिर्यादीला बसच्या मागील भागात नेले.

त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या चरित्रावर संशय घेत तुझे दुसऱ्याच माणसासोबत अफेअर आहे. तू मोबाईलवर चांगले स्टेटस ठेवते असे म्हणून धारदार लोखंडी कटरने फिर्यादीच्या गळ्यावर वार केले. या घटनेत फिर्यादी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Post a Comment

0 Comments