माझ्यावर भूकतो? थांब दाखवतोच म्हणत कुत्र्याची हत्या

 


कुत्रा अंगावर भुंकला म्हणून बंदुकीने गोळी घालत कुत्र्याला ठार मारण्यात आलं. ही चीड आणणारी घटना बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात घडली.

परळीतील धर्मापुरी फाटा येथे असलेल्या एका हॉटेलच्या आवारातील कुत्र्यावर संतापलेल्या इसमाने गोळीबार केला आणि त्याचा जीव घेतला. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.

धर्मापुरी फाटा इथं विकास बनसोडे यांचं हॉटेल वीर बिअर बार आहे. याच ठिकाणी त्यांनी काही कुत्रे देखरेख करण्यासाठी पाळले होते. या बिअर बारमधील एक कुत्रा भुंकला म्हणून त्याची हत्या करण्यात आली.

Post a Comment

0 Comments