कर्जाच्या ओझ्याखाली घुसमटनाऱ्या कुटुंबानं घेतला टोकाचा निर्णय

 


बिहारमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका कुटुंबाने मृत्यूला कवटाळलं आहे. नवादा परिसरातील न्यू एरिया येथील केदार लाल गुप्ता यांनी बुधवारी रात्री पत्नी आणि ४ मुलांसह विष पिऊन आत्महत्या केली आहे.

कुटुंबातील ५ सदस्यांच्या आकस्मित मृत्यूनं परिसरात खळबळ माजली आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

मृतांमध्ये घरातील प्रमुख केदार लाल गुप्ता, पत्नी अनिता कुमारी, ३ मुले प्रिन्स कुमार, शबनम कुमारी, गुडिया कुमारी यांचा समावेश आहे तर १ मुलगी साक्षी तिची अवस्था बिकट आहे. तिच्यावर नवादा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याठिकाणाहून तिला पटणा येथे नेण्यात आले आहे. केदार लाल गुप्ता शहरातील विजय बाजारात फळांचे दुकान चालवतात. त्यांच्यावर खूप कर्ज होतं. त्यामुळे कर्ज देणाऱ्यांनी त्यांच्यावर पैशांसाठी दबाव टाकला होता. वारंवार होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून केदार गुप्ता आणि कुटुंबाने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.


Post a Comment

0 Comments