कोयत्याने डोक्यात वर्मी घाव घालत चुलत्याने केला पुतण्याचा खून

 


वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे आरोपीच्या बहिणीला खुणवाखुणवी करत वाईट हेतूने बोलत होता. याचा राग मनात धरून रात्री अंधाराचा फायदा घेत चुलत्याने १५ वर्षीय पुतण्याच्या डोक्यात कोयत्याने 4 वार करत चुलत्याने खून केला.

ही घटना पिंपरखेड येथे बुधवार (दि.23) रात्री घडली. गावामध्ये लाईट आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला नंतर पिंपरखेड तालुक्यात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील सुरज श्रीकृष्णा शिंदे (वय१५) हा तरुण आजोबांकडे रहात होता. बुधवार रात्री ७:३० च्या दरम्यान पुतण्या सुरज शिंदे व चुलते गणेश अर्जुन शिंदे (वय २०) या दोघांत गणेश‌ शिंदे याच्या बहिणीला खुणवाखुणवी करत बहिणीला वाईट हेतूने बोलत असल्यावरुन हनुमान मंदिराच्या जवळ दोघांत वाद झाला. या वादात चुलत्याने पुतण्यावर कोयत्याने डोक्यात ४ वार करत सुरज शिंदे यास गंभीररित्या जखमी केले.

पिंपरखेड येथे रात्री लाईट आल्यानंतर सुरज शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आला. नातेवाईकांनी जखमी तरुणाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी सुरजला मृत घोषित केले‌.

या घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला आहे. या प्रकरणातील मयताचा चुलता आरोपी गणेश शिंदे याने घटना घडल्यानंतर पलायन केले होते. आरोपीस वडवणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने देवडी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपी गणेश शिंदे याने गुन्ह्याची कबुली दिली. मृत सुरजचे आजोबा संपत्ती गणपती शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश अर्जुन शिंदे याच्या विरोधात वडवणी पोलीस ठाण्यात रात्री उशीरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुने करत आहेत.

Post a Comment

0 Comments