बसमध्ये चढताना दागिने चोरणारा रंगेहात अटकेत


 याप्रकऱणी 42 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात पिर्याद दिली असून इंद्रजीत मोहन गुरव (वय 31 रा. कासारवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथे फिर्यादी त्यांच्या मुलीसह डेक्कनला जाण्यासाठी बसची वाट पहात होत्या.यावेळी बसमध्ये चढताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून घेतले ज्यामध्ये त्याचे तीन तुकडे झाले. यावेळी नागरिकांनी त्याला शिताफीने पकडून पोलिसांच्या हवाली केले. रावेत पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments