धक्कादायक, गावातील व्यक्तीच्या छेडछाडीला कंटाळून महिलेची आत्महत्या

 


पैठण तालुक्यातील गोपेवाडी येथील एका विवाहित महिलेने गावातील व्यक्तीच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली आहे.

महिलेने शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, परिसरात खळबळ माजली आहे. पल्लवी रवींद्र झाडे (वय 26 , रा. गोपेवाडी, ता. पैठण) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

मृत महिलेचा पती रवींद्र झाडे यांनी पैठण पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या गोपेवाडी गावातील प्रशांत बाबासाहेब खराद (वय 30 वर्षे) हा त्यांच्या पत्नीची छेडछाड करत होता. त्यामुळे खराद याच्या छेडछाडीला कंटाळून पल्लवी झाडे यांनी शेतातील विहिरीजवळील चिंचेच्या झाडाला साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची तक्रार रवींद्र झाडे यांनी दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी पैठण पोलिसात नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments