प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अक्षय चव्हाण (वय 28 रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार काळ्या रंगाची पल्सर वरून आलेल्या इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षामधून त्यांचे भाडे सोडण्यासाठी बाणेर कडे जात होते. यावेळी सिग्नलला चौकात थांबले असताना आरोपी दुचाकीवरून आला व त्याने फिर्यादी यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरला. यावेळी रिक्षा खाली उतरून फिर्यादी यांनी जाब विचारला असता आरोपीनेच उलट फिर्यादीशी वाद घालत थांब तुला बघून घेतो म्हणून फिर्यादी जवळ आला. त्याने त्याच्या खिशातील चाकु काढून फिर्यादीच्या पोटावर, खांद्यावर वार करून त्यांना जखमी केले. यावरून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
0 Comments