साप चावल्यावर डॉक्टराऐवजी गेला मांत्रिकाकडे , पुढे घडलं असं काही

 


आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगातही अनेक धक्कादायक घटना समोर येतात. अनेक जण आजही अंधश्रद्धेला बळी पडताना दिसत असतात. अशीच एक धक्कादायक घटना पनवेल तालुक्यातून समोर आली आहे.

एका व्यक्तीला साप चावल्यानंतर तो डॉक्टरांकडे न जाता थेट मांत्रिकाकडे गेला. मात्र, या अंधश्रद्धेपायी त्याचा जीव गेला असता. अखेर पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी या व्यक्तीवर योग्य उपचार केल्यानतंर त्याचा जीव जाता जाता वाचला. नारपोली गावातील नामदेव पदु मढवी वय वर्ष 51 यांना शेतात काम करताना विषारी साप चावल्याची घटना नुकतीच घडली.

मात्र, यानंतर ते तत्काळ रुग्णालयात उपचार न घेता एका मांत्रिकाकडे शरीरातील विष उतरवण्यासाठी गेले. मात्र, याठिकाणी त्याचा उलटा परिणाम होऊन त्यांची प्रकृती खालावली. अखेर अत्यावस्थेत त्यांनापनवेल उपजिल्हा रुग्णालयात आणल्यावर त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले आणि अशाप्रकारे मढवी यांचे प्राण वाचले. विशेष म्हणजे मांत्रिकाने डॉक्टरांकडे न जाता घरी जाण्याचा सल्ला दिल्याने जे प्रकरण जीवावर बेतले असते.

मात्र, तब्बल सात तासांनी डॉक्टरांकडे आले असतानाही योग्य उपचार करून रुग्णाचे प्राण वाचविले. याबाबत डॉक्टरांनी सर् दंश झाल्यावर मांत्रिकाकडे न जाता तत्काळ सरकारी दवाखान्यात उपचार करावे, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर पांचाळ यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments