प्रियकराशी बोलली म्हणून तरुणीला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण , तिघींना अटक

 


भरस्त्यात एका तरुणीला बेदम मारहाण करणाऱ्या 3 तरुणींना पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीला लाथा बुक्क्यांनी आणि बेल्टच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली होती. या मुलीला मारहाण होत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पीडित तरूणीला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली होती. मारहाण करणाऱ्या तरुणींपैकी एकीने पीडितेच्या अंगावर बसून तिला मारहाण केली होती तर इतर तरुणींनी पीडितेला लाथा बुक्क्यांनी मारलं होतं. पीडितेचा दोष इतकाच होता की तिने मारहाण करणाऱ्या तरुणींपैकी एकीच्या प्रियकरासोबत गप्पा मारल्या होत्या.

मध्य प्रदेशातील इंदूरमधल्या एलआयजी चौकात ही मारहाणीची घटना घडली होती. पीडितेचे नाव प्रिया वर्मा (25 वर्षे) असल्याचे सांगण्यात आले आहे. मेघा मालवीय, टीना सोनी आणि पूनम अहिरवार या तिघींनी तिला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत प्रिया जबर जखमी झाली आहे. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणींविरोधात जीव घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments