पती पत्नीला मारहाण करुन 40 तोळे सोने लंपास

 


तीर्थपुरी येथील उल्हासराव पवार यांच्या घरी (खिडकीचा मळा) शुक्रवारी पहाटे दोन वाजता सशस्त्र दरोडा पडला असून पती पत्नीला मारहाण करून जवळपास ४० तोळे सोने लंपास केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

या विषयी अधिक माहिती अशी,की तीर्थपुरी येथील खिडकीचा मळा येथील उल्हासराव पवार यांच्या घरी शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता सात ते आठ दरोडेखोरानी प्रवेश केला.घरात उल्हासराव पवार पती पत्नी झोपलेले असताना त्यांच्या घराच्या कडया दरोडेखोरानी लावल्या.कडी लावल्याचा आवाज आल्याने उल्हासराव पवार यांना जाग आली.

त्यानी बाजूच्या घरात झोपलेले त्यांचे लहान बंधू सुरेश पवार यांना आवाज दिला असता ते उठुन घराच्या बाहेर आले असता दरोडे खोरानी त्याना मारहाण करून पत्नीला मारहाण केली.पत्नीच्या हातातील सोन्याची बागडी व अंगठया असा इतर सोन्याचा ऐवज असा एकूण 40 तोळे सोने लंपास केले.दरोडेखोरानी बाजूच्या घराच्या कड्या लावल्या होत्या.त्याच्या घराच्या बाजूला शेत असल्याने याठिकानाहून दरोडेखोर आले असावे.

घरात जवळपास वीस मिनिटं चोरांनी धुमाकूळ घातला असून सुरेश एकनाथ पवार यांना मारहाण झाली असून त्यांच्या बोटाला जमख झाली.त्यांची पत्नी अनुराधा सुरेश पवार यांच्या डोक्यावर काठीचा मार लागला असून गालावर जखम झाली आहे.याघटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके यांनी घटनास्थळी भेट देऊन वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना माहिती दिली.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे,गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी सुभाष भुंजग, श्री.महाजन,गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी भेट दिली.यावेळी फिंगर प्रिंट व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.


Post a Comment

0 Comments