धक्कादायक.... गळ्यावर वार करुन चिमुरडीची हत्या

 जालना शहरात खळबळजनक घटना समोर आली आहे. काकांकडे शिक्षणासाठी आलेल्या चिमुरडीचा गळ्यावर चाकूने वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. १३ वर्षाच्या चुलत बहिणीवर हत्या केल्याचा संशय आहे.घनसावंगी तालुक्यातील एका गावातील रहिवाशी असलेली ईश्वरी या आठ वर्षीय इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीची गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली.

जालना शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.


Post a Comment

0 Comments