संतापजनक , पत्नी गळफास घेत असताना पतीच धक्कादायक कृत्य

 


देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता उत्तर प्रदेशातील कानपूरमधून पतीच्या कारनाम्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कानपूर येथे पत्नी पंख्याला लटकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना पती तिला वाचवण्याऐवजी व्हिडिओ बनवत राहिला. आधी पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, नंतर दुसऱ्यांदा गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही धक्कादायक घटना कानपूरच्या गुलमोहर नगर येथील आहे. कानपूरच्या किडवाई नगर येथील रहिवासी असलेल्या राज किशोर गुप्ता यांनी 4 वर्षांपूर्वी त्यांची मुलगी शोभिता गुप्ता हिचा विवाह गुलमोहर भागातील रहिवासी संजीव गुप्तासोबत केला होता. मंगळवारी दुपारी शोभिताने राहत्या घरी गळफास लावून घेतला. त्यानंतर संजीवने पत्नीच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली.

शोभिताचे वडील राजकिशोर कुटुंबीयांसह घाबरून मुलीच्या सासरी पोहोचले. तेथे त्यांनी मुलीचा मृतदेह बेडवर पडलेला दिसला. तसेच यावेळी पती संजीव तिच्या चेस्टमध्ये पंपिंग करत होता. जेव्हा मृत शोभिताच्या वडिलांनी पती संजीव गुप्ताला विचारले की, त्यांच्या मुलीने कशी आणि का फाशी लावली.

मग त्याने त्याच्या मोबाईलमधील व्हिडीओ दाखवला. यावेळी तो म्हणाला की, ही आधी गळफास घेण्याचा प्रयत्न करत असताना मी तिला वाचविले. याचा व्हिडिओही त्याने त्याच्या सासऱ्यांना दाखवला. मात्र, व्हिडिओ पाहिल्यावर त्यांना मोठा धक्का बसला.


Post a Comment

0 Comments