प्रेम केलं म्हणून शिक्षा काय तर , पंच म्हणाले रस्त्यावरची थुंकी चाट

 


बिहारच्या समस्तीपूरमध्ये एका पंचायतीने प्रेम करणाऱ्या एका जोडप्याला भयंकर शिक्षा दिली आहे. समस्तीपूरच्या विभूतीपूरमध्ये एका मुलाने दुसऱ्या धर्माच्या मुलीवर प्रेम केले.

त्यावरुन त्या मुलाला गावातील पंचायतीने प्रियकराला मारहाण करून माफी मागण्यास सांगितली. त्यानंतर त्याला थुंकी चाटण्याची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.

विभूतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात दोन वर्षांपूर्वी वेगवेगळ्या धर्मातील मुलगा आणि मुलगी प्रेमात पडली होती. त्यामुळे दोघांना भेटण्याची ओढ कायम राहिली होती. त्यामुळे त्यांना एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले.

कुटुंबीयांचा आणि गावातील लोकांचा विरोध होणार असल्याने या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रेयसीने तरुणाला फोन करुन त्याला घरातून बाहेर येण्यास सांगितले.

मात्र दोघंही ज्या ठिकाणी भेटणार होते, त्या ठिकाणी भेटण्याआधीच मुलीच्या कुटुंबीयांनी या दोघांनाही पकडले आणि मुलाला बेदम मारहाणही केली.


Post a Comment

0 Comments