कार- दुचाकी अपघातात आईआई व मुलगा जागीच ठार

 


अंकली प्रतिनिधी : हुक्केरीजवळ कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. हाअपघात रविवारी रात्री दहा वाजता झाला. भारती अनिल पुजेरी (वय 28) आणि वेदांत अनिल पुजेरी (वय 6) अशी मृतांची नावे आहेत.

दुचाकी चालक अनिल शंकरय्या पुजेरी (वय 35) आणि कारमधून प्रवास करणारा किरण लोकाया सालीमठ (वय 28) हे जखमी झाले आहेत.

अनिल पुजेरी, त्याची पत्नी भारती आणि मुलगा वेदांत हे दुचाकीवरून जात होते. यावेळी गोकाककडून हुक्केरीकडे जाणाऱ्या कारने हुक्केरीहून घटप्रभाकडे जाणाऱ्या दोन कार आणि अनिल पुजेरी यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकी आणि इंडिका कारचा चक्काचूर झाला. यामध्ये दुचाकीवरील अनिल यांच्या पाठीमागे बसलेल्या भारती व वेदांत यांचा जागीच मृत्यू झाला. हुक्केरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

Post a Comment

0 Comments